पंकजाताई मुंडे यांना आमदारकी साठी भाजपकडून विधान परीषदेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पाथर्डीत अभिनंदनाचे फलक झळकले

पंकजाताई मुंडे यांना आमदारकी साठी भाजपकडून विधान परीषदेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पाथर्डीत अभिनंदनाचे फलक झळकले

 

(सुनिल नजन” चिफब्युरो” अहमदनगर जिल्हा) लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचा अटीतटीच्या झालेल्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून निसटता झालेला पराभव भाजप मधील राष्ट्रीय नेत्यांच्या फारच जिव्हारी लागला होता.पराभवाचे खापर अनेकांच्या माथी मारले गेले होते.नंतर राज्यसभेवर त्यांची वर्णी लागेल असे घाटत असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला स्वार्थ साधत बाजी मारून बारामती लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आपल्या पत्नी सौ सुनेत्रा पवार यांना राज्य सभेची उमेदवारी देऊन आपल्या पदरात खासदारकी पाडून घेऊन आपलेच घोडे पुढे दामटले होते. आणि पंकजा मुंडे यांना डावलले होते.त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक भलतेच आक्रमक झाले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे हसे होउनये आणि मुंडे समर्थक मतदार नाराजीतून महाविकास आघाडी कडे जाउ नये म्हणून भाजपाला हे उशिरा सुचलेल शहाणपण आहे. गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांना भाजपाने दिलेली वागणूक उभ्या महाराष्ट्राने अनुभवली आहे.परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावात आमदारकी वरुन रणकंदन होउन पुन्हा नवा वाद उफाळून येउ नये म्हणून ही वरीष्ठ नेत्यांनी दखल घेऊन आताच सोय करून ठेवण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाउ दौंड यांनी पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत करीत पाथर्डीत अभिनंदनाचे फलक झळकवले आहेत. भाजपाने पंकजा मुंडे यांच्या बरोबरच योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके,अमित गोरखे,आणि सदाभाऊ खोत यांनाही विधानपरीषदेच्या आमदारकीची उमेदवारी बहाल केली आहे.महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूकीत दुधाने पोळलेल्या भाजपा नेत्यांनी आता विधान परीषदेच्या निवडणूकीत ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभेच्या निवडणूकीत भरून काढला जाईल असे भाजपाचे नेते आता सर्वत्र सांगत सुटले आहेत. पंकजा मुंडे यांच्या आमदारकी मुळे महाराष्ट्रात भाजपा निश्चितच बलवान होईल असे आता देशातील नेत्यांना वाटू लागले आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या चुका आता विधानसभा निवडणुकी पुर्वीच दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीला शह देण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे.