प्रा राजेंद्र चिंचोले सरांचा गौरव करीत सेवापुर्ती सोहळा उत्साहात

प्रा राजेंद्र चिंचोले सरांचा गौरव करीत सेवापुर्ती सोहळा उत्साहात

 

प्रा चिंचोले सरांसारखं शिक्षकांनी व्यासंगी, बहु आयामी, ज्ञाननिष्ठ असावं–डॉ बी बी चव्हाण

 

 

पाचोरा–शिक्षकांनी व्यासंगी, बहुआयामी व ज्ञाननिष्ठ असावं,दर्जेदार शिक्षण देऊन अध्यापन केल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतात तेच प्रा राजेंद्र चिंचोले सरांनी केलं असे गौरवोद्गार शिक्षण मंडळाचे चेअरमन तथा नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ बी बी चव्हाण यांनी प्रा राजेंद्र चिंचोले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. डॉ बी बी चव्हाण यांनी पुस्तकांचे वाचन आवश्यक असून पुस्तकातून क्रांती व शांती जन्माला येते. शिक्षणामुळे जीवनात बदल होतात. व्यथा व वेदना आयुष्यातून निर्मूलन करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे .चिंचोले सरांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देत असताना राज्यभर स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन करून समाजासाठी खूप मोठे कार्य केले आहे अशा प्रकारचे गौरवोदगार बी बी चव्हाण यांनी केले .दि २२ रोजी शनिवारी ग्रामविकास शिक्षण मंडळ पिंपळगाव हरेश्वर यांचे तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा भौतिकशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा ग्राम विकास विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, शिक्षण उपसंचालक डॉ बी बी चव्हाण, मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव शामकांत देवरे,दीपस्तंभचे संचालक यजुवेंद्र महाजन, अमोल शिंदे, पिटीसी चेअरमन संजय वाघ, निर्मल स्कूलच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, व्ही.टी. जोशी , डॉ बी एन पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मधु काटे ,उद्धव मराठे, नितीन तावडे ,देविदास महाजन, पी एस पाटील, ए एस जाधव, एसटी गीते, ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष पी बी पाटील, चिटणीस एस व्ही गीते, संस्थेचे मुख्याध्यापक पी  एस महाजन सर, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आजी-माजी संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रा चिंचोले सरांच्या पत्नी सविता चिंचोले आई प्रमिला चिंचोले, भावंड, नातेवाईक, सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी-माजी विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांच्या कार्यपद्धती व जीवनशैली विषयी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, यजुर्वेंद्र महाजन, शामकांत देवरे ,वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, संजय वाघ,संस्थेचे अध्यक्ष पी बी पाटील, शिक्षक अर्जुन सावळे ,सौरभ चिंचोले, नितीन तावडे ,पी एल मेखा, सुमित पाटील यांनीही मनोगत व्यक्त करीत प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रामविकास विद्यालयातील ३५ वर्ष सेवेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश झोत टाकला. याप्रसंगी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या मनोगतातून राजेंद्र चिंचोले हे समाजासाठी दीपस्तंभ आहेत अशा प्रकारचे गौरवोद्गार काढले. प्रा राजेंद्र चिंचोले सरांसारखे व्यक्तिमत्व इतर शिक्षकांनी अंगी कारावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात दिलीप वाघ यांनी व्यक्त केले. तर सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांनी ग्राम विकास मंडळ व पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सद्भावना व्यक्त केली. यापुढेही माझे कार्य करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विनामूल्य अविरत सुरू राहील असा ठाम निश्चय व्यक्त केला. यावेळी संस्थेतर्फे प्रा राजेंद्र चिंचोले यांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ,सपत्नीक ड्रेस, सुवर्ण अंगठी भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला.तसेच उपस्थित नागरिकांनीही यथोचित सत्कार केला. सन्मान पत्राचे वाचन मनोज सोनवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप पाटील व अभिजीत पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन मनोज बडगुजर यांनी केले.