नगरदेवळा गावाचे पहिले आय आय टी ईशान जाधव यांचा सत्कार

नगरदेवळा गावाचे पहिले आय आय टी ईशान जाधव यांचा सत्कार

 

नगरदेवळा ता.पाचोरा :

तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले नगरदेवळा येथून ईशान राजेश जाधव यांनी आयआयटी पटना येथून अभियांत्रिकी पुर्ण केल्याने त्यांचे गरीब नवाज फाऊंडेशन मार्फत सत्कार करण्यात आला. ईशान हे नगरदेवळा गावातील पहिले आयआयटी इंजिनिअर आहे. त्यांनी आपले प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातील नावलौकिक असलेली शाळा सरदार एस के पवार विद्यालय येथून पूर्ण केलेले आहे. सामान्य घरातून असलेले ईशान आयआयटी झाल्याने हि गोष्ट पुर्ण कुटूंब , मित्र परिवार,गावासाठी अभिमानाची आहे. ईशान यांनी आपल्या परिश्रम व जिद्दीने आपले सूनियोजित यश प्राप्त केले व सिद्ध केले कि यश प्राप्ती साठी गाँव लहान आहे, किंवा तुम्ही मातृभाषा मध्ये शिकले आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही असे मत त्यांनी गरीब नवाज फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांशी बोलताना मांडले.या वेळी गरीब नवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख अफरोज रहिम, एस के पवार विद्यालयाचे सेक्रेटरी शिवनारायण जाधव, माजी ग्राम पंचायत समिति सदस्य शेख अन्सार अमीर, शिक्षक सेना संघटनाचे जिल्हा उप संघटक शेख जावेद रहिम उपस्थित होते.