पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे यांची दोन महिन्यात अवैध धंद्यावर जोरदार कारवाई

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे यांची दोन महिन्यात अवैध धंद्यावर जोरदार कारवाई

( पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले)

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे गेल्या दोन महिन्यापासून रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे साहेब यांनी दोन नंबर वाल्यांना सळो की पळो करून सोडलेले असून त्यांच्यावर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे तसेच त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी श्री डी वाय एस पी धनंजय येरूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यात तीस ते पस्तीस दारूभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या असून त्यांच्यावर कारवाई करून दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे. तसेच जनसामान्यांसाठी श्री प्रकाश काळे साहेब सहकार्याची भूमिका करत असून पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील यांना सहकार्याची भूमिका करीत असतात त्यांनी आपल्या दोन महिन्याच्या या काळात गुन्हेगार व दोन नंबर वाल्यांवर वचक बसविलेले असून पिंपळगाव पोलिसांनी चांगल्या कामगिरी केल्यामुळे जिल्हा अधीक्षक यांच्याकडून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे पिंपळगाव पोलीस स्टेशनचे कामकाज जोरात असून सर्वसामान्यांना न्याय मिळत असतो. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे साहेब पीएसआय श्री अमोल पवार ये एस आय श्री आर के पाटील पोलीस हवालदार श्री रंजीत पाटील श्री किरण ब्राह्मणे श्री रवींद्र पाटील श्री अरुण राजपूत श्री अभिजीत निकम श्री जितेंद्र पाटील या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वैद्यंवर संक्रांत आणली आहे.