शेतकरी पूत्र-अमोलभाऊ शिंदे मैदानात 

शेतकरी पूत्र-अमोलभाऊ शिंदे मैदानात

 

परधाडे ता.पाचोरा व परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी वारा व पावसामुळे केळी,निंबु व इतर फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.याप्रसंगी शेतकरी पूत्र अमोलभाऊ शिंदे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. व संबंधित अधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामे करून घेतले.

याप्रसंगी कृषी सहाय्यक बागुल भाऊसाहेब तलाठी डोंगरे आप्पा व पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपा तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ पदाधिकारी एकनाथ महाजन, सरपंच शशिकांत (सचिन) पाटील योगेश महाजन विजय महाजन माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल पाटील संदीप पाटील भरत अहिरे शिवनाथ महाजन किरण पाटील योगेश पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.