विधानसभेला जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या बारा ही जागा निवडून आणू  खासदार निलेश लंके 

विधानसभेला जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या बारा ही जागा निवडून आणू  खासदार निलेश लंके

विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद दाखवू ः सुजय विखे (सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) विधानसभा निवडणूक आता तिन महीन्यात म्हणजे पंधरा आँगष्टच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल.विधानसभेला अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या बारा ही जागा निवडून आणू अशी ग्वाही महाविकास आघाडीचे अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी दिली. ते प्रतापराव ढाकणे मित्र मंडळाच्या वतीने पाथर्डी येथे संस्कार भवनात आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक नेते प्रतापराव ढाकणे, पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा योगिता राजळे, युवती तालुका अध्यक्ष ज्योती जेधे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाशिरभाई शेख, उबाठाचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख,नवनाथ चव्हाण, गहिनीनाथ शिरसाठ, बंडू बोरुडे, सिताराम बोरूडे,गणेश चितळकर,अरविंद सोनटक्के,आरती निर्हाळी,सपना काटे,उषा जायभाय यांच्या सह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार निलेश लंके यांनी प्रतापराव ढाकणे यांच्या कडे स्मीतहास्य करीत ” मी प्रताप बबनराव ढाकणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की” हे शब्द उच्चारताच भरसभेत शिट्ट्या, टाळ्या, आणि घोषणाबाजी ने सभागृह दणाणून गेले. ढाकणे कडे बोट दाखवत प्रतापराव काळजी करूनका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आमदाकीच्या कामाला लागा.पण स्टेजवर बसणाऱ्यांना ही लंकेंनी चांगल्या कानपिचक्या दिल्या तुमच्या गावात प्रतापकाकाला विरोधकापेक्षा जास्त मत मिळाली पाहिजे.असे ठणकावून सांगितले कारण कोणत्याही नेत्यांच्या गावात लंकेना जास्त मते मिळाली नाहीत हा धागा पकडून लंकेनी निशाणा साधला.लोकसभेचे गणित वेगळे असते आणि विधानसभेचे गणित वेगळे असते हे लक्षात घ्या. विकास कामे करताना ज्यांनी मत दिली त्यांचेही आणि ज्यांनी दिले नाहीत त्यांचीही कामे करणार. त्यांचा दोष नाही तो आपला आहे आपण त्यांच्या पर्यंत पोहोचलो नाहीत ही खंत त्यांनी व्यक्त केली.विकास कामात गटबाजी करणार नाही कारण उबाठा शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी संघटना, काँम्रेड,आप,बि आर एस, मागासवर्गीय संघटना,जयमल्हार संघटना या सर्वांनी मला मदत केली आहे.म्हणून मी खासदार झालो आहे.कोणाची जिरवा जिरवी करण्यासाठी मी खासदार झालो नाही असा विरोधकांचे नाव न घेता लंकेंनी टोला लगावला. शेवगाव येथे ही अनेक कार्यकर्त्यांनी खासदार लंके यांचा सन्मान केला. तर लोकसभेला पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार सुजयदादा विखे यांनी ही अहमदनगरच्या विळदघाटात कार्यकर्त्यांना आमंत्रित करून सांन्तवन सभा घेतली. निवडणूकीत काय चुका झालेल्या आहे याकडे दुर्लक्ष करून पराभवाने खचून न जाता आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद दाखवून विरोधकांना चारीमुंड्या चितपट करा असा ईशारा देऊन विखेंनी विधानसभा निवडणुकीचे पुन्हा नव्याने रणशिंग फुंकले आहे. झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी विरोध केला त्यांचा हिशेब विधानसभा निवडणुकीत पुर्ण करून महायुतीची ताकद काय आहे ते दाखवून द्या असा ईशारा माजी खासदार सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पराभवानंतर मरगळ आलेले कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा धुराळा शांत होतो न होतो तोच आता पुन्हा विधानसभा निवडनुकीच्या लगिनघाईचा नगारा ढगांच्या गडगडाटासह जोराने वाजू लागला आहे. भर पावसाळ्यात विधानसभा निवडणूकिच्या रणधुमाळीची चिखलफेक सुरू झाली आहे.आणि “येरे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या” असे म्हणून कार्यकर्ते जोमान विचार करत विधानसभा जिंकण्यासाठीच्या ईर्शेने कामाला लागले आहेत.सुजय विखे स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे मात्र त्यांनी नेमके गुलदस्त्यातच ठेवले आहे.विखेंचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण ही निवडणूक विखे विरोधात पवार अशीच होती.म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. विखे विरोधात पवार हा संघर्ष भविष्यात चांगलाच धुमसत राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.