प्रकाश तेली यांच्या पाणी काव्य संग्रहाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते प्रकाशन

प्रकाश तेली यांच्या पाणी काव्य संग्रहाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव :-  कवी, लेखक, गीतकार, व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांच्या पाणी ह्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे झाले प्रकाश तेली हे सामाजिक व संवेदनशील कवी असून त्यांनी 5000 पेक्षा जास्त सामाजिक व इतर कविता ह्या लिहिलेल्या असून 7000 पेक्षा जास्त घोषवाक्य/स्लोगन देखील लिहिलेले आहेत

पाणी काव्य संग्रहात काय आहे :- पाणी काव्य संग्रहात पाण्याचे महत्व, पाणी बचतीची आवश्यकता, पाण्याचा होणारा दुरूपयोग ह्याचे मार्मिक असे विवेचन प्रकाश तेली यांनी ह्या काव्य संग्रहात केलेले असून समाजाला जलसाक्षर करण्याचा देखील अतिशय सुंदर प्रयत्न प्रकाश तेली यांनी केलेला आहे

     मानवी जीवनात पाण्यास अनन्यसाधारण महत्व आहे आणि समाज ह्याकडे कसा दुर्लक्ष्य करतो यावर प्रकाश तेली यांनी उदाहरणासह प्रकाश टाकला आहे

     सजीव सृष्टीचे व देशाचे आस्तित्व हे पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करावी आणि सक्षम समाज निर्मितीच्या कार्यास हातभार लावावा आणि समस्त देशवासियांना  जागृत करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे असे प्रकाश तेली यांनी सांगीतले

 

मुख्य सचिव अधिकारी डॉ. नितीन करीर यांच्या कडून प्रकाश तेली यांच्या कार्याचे कौतुक :-

प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्याचे डॉ. नितीन करीर यांनी कौतुक केले असून पाणी काव्य संग्रहाच्या कविता ह्या हृदयाला स्पर्श करणार्या व दिशादर्शक आहेत असे डॉ नितिन करीर यांनी ह्या प्रसंगी सांगीतले

  प्रकाश तेली यांचे आतापर्यंत 12 काव्य संग्रह प्रकाशित झालेले असून त्यांनी साहित्य, कविता व घोषवाक्य लेखनाचा विश्वविक्रम देखील केलेला आहे त्यांच्या कार्याची विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद झालेली असून त्यांचे आता वीज बचती वरील काव्य संग्रहाचे काम सुरु आहे.

प्रकाश तेली पाण्यावर लवकरच गाणे बनविणार:-

जलसाक्षरता जागरूकता अभियानासाठी तसेच पाण्याचे महत्त्व सहज व सोप्या भाषेत समजावे  यासाठी प्रकाश तेली पाण्यावर गीत देखील लिहिणार आहेत

प्रकाश तेली यांच्या काव्य संग्रहाचे पंतप्रधान कार्यालय, उपराष्ट्रपति कार्यालय, राज्यपाल अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्ञानपीठ व पद्मश्री पुरस्कार प्राप्त लेखक व अनेक महनीय व्यक्तीनी गौरव केला आहे.