कोपरे – जवखेडे – वाघोली शिवारातील दातीरवस्ती येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) पाथर्डी – शेवगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोपरे -जवखेडे- वाघोली शिवारातील मायनर क्रं.८ मधील दातीरवस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि.१७ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ह.भ.प.सदगुरू यादवबाबा वाघोली कर व गुरुवर्य बाळक्रुष्ण महाराज भोंदे यांच्या क्रुपा आशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. दररोज पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, ग्रंथ वाचन, हरिपाठ, किर्तन, व जागर असे कार्यक्रम होणार आहेत.सर्व ह.भ.प.तुकाराम महाराज केसभट, अभिमन्यू महाराज भालसिंग,किरण महाराज कुलकर्णी, धनंजय महाराज उदावंत, श्रीक्रुष्ण महाराज रायकर, अमोल महाराज सातपुते, दत्तात्रय महाराज जगताप,यांची किर्तने होणार आहेत.शुक्रवार दिनांक २३/२/२४ रोजी सायंकाळी तिनं ते पाच वेळेत ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक सोहळा साजरा होणार आहे.शनिवार दिनांक २४/२/२४ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत ह.भ.प.हरीभाउ महाराज भोंदे यांच्या काल्याच्या किर्तनाने महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे.म्रुदुंगाचार्य म्हणून ह.भ.प.बाबासाहेब महाराज मतकर, उद्धव महाराज वाघमारे, भालसिंग महाराज तर गायनाचार्य म्हणून दिलिप महाराज गायकवाड, नवनाथ महाराज गोरे, आणि काकडा भजनाचे बाळक्रुष्ण महाराज साठे हे काम पहाणार आहोत.तरी कोपरे , जवखेडे, वाघोली पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन समस्त दातीरवस्ती मायनर क्र.आठ वरील भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.