जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा व मुलांची शाळा पाचोरा येथे डोळ्यांचे विकाराबाबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

 

 

डोळ्यांचे विकाराबाबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन कार्यक्रम
जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा व मुलांची शाळा पाचोरा येथे डोळ्यांचे विकाराबाबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन कार्यक्रमचा आयोजन करण्यात आला. हया कार्यक्रम मध्ये पाचोरा शहरातील डोळ्यांचे तज्ञ डॉक्टर तनवीर देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या गोराडखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या बिंदू अंतर्गत हा कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला. डॉक्टर तनवीर यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व त्यांना दाखवला की आजच्या नवीन युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापर कसा करावा, तसेच आपले खानपान व डेली रुटीन यातून आपले डोळ्यांची कशी देखभाल व सुरक्षा करावी. त्यांनी यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या पटेल नेत्रालय मार्फत मुफ्त चेकअपचे आश्वासन हि दिले. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. आभार शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल एजाज यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षिका शाहेदा हारून, शाहेदा युसुफ, शबाना देशमुख, सूमय्या देशमुख, शेख सलाउद्दीन, शाइस्ता देशमुख,आस्मा तबससुम, सलमा कोसर, सनोबर मलीक,अस्फा सौदागर आदी उपस्थित होते.