भव्य वर्ल्ड रेकॉर्ड रांगोळी – २२ जानेवारी २०२४ – जळगाव
माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्या संकल्पनेतून व कला छंद आर्ट, पाचोरा यांच्या अथक परिश्रमातून – भव्य वर्ल्ड रेकॉर्ड रांगोळी
जळगाव आयोध्या येथे आज २२ जानेवारी २०२३ रोजी प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडत असून पंतप्रधान मोदींच्या आवाहना नंतर देशभरात उत्सव साजरा होतं आहे त्याच पार्श्वभूमीवर जळगाव येथे भाजपा नेते तथा पर्यावरण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रेरणेने माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणात कला छंद आर्ट ग्रुप पाचोरा जिल्हा जळगाव येथील
सहभागी कलाकार
शैलेश कुलकर्णी
,मनोज राजपूत ,देवांगिनी मोकाशी, सत्यजित पाटील, साई कोळी,प्रणव कोळी, सुनयना बालोद, कीर्ती कुमार सोनवणे ,उन्नती पाटील ,नेहा राजपूत
प्रियंका कुलकर्णी, वैभव शिंपी ,रेणुका बडगुजर ,अश्विनी गुरव यांनी १५००० चौरस फूट (१५० बाय १०० फूट ) जागेवर रांगोळीच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचे चित्र साकारण्यात आले आहे, याचं सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा चित्र साकारण्यात आले आहे. या रांगोळी साठी लेक रंग तसेच पिगमेंट रंग वापरण्यात आले आहे. या साठी निळा,पिवळा,नारंगी,लाल इत्यादी शेडस् वापर करण्यात आला आहे. यासाठी कलाछंद आर्ट्स फाउंडेशनचे एकूण १५ – १६ आर्टिस्ट यांनी 60 तास सलग परिश्रम करून ही भव्य कलाकृती साकारली आहे.ही रांगोळी साकारणाऱ्या कलाकारांमध्ये शिक्षक , शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी गृहिणी इत्यादींचा समावेश आहे.
कला छंद आर्ट, पाचोरा
8446932849