बंद करण्यात आलेले लोकशाही चॅनल तात्काळ सुरू करा
– महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन…
शहर प्रतिनिधी / पाचोरा
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाकडुन लोकशाही न्युज चॅनल हे ३० दिवसांकरिता बंद करण्यात आले आहे. सदरचे चॅनल तात्काळ सुरू करा अशा आषयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार संभाजी पाटील यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जेष्ठ सदस्य प्रा. सी. एन. चौधरी, अनिल (आबा) येवले, राजेंद्र खैरनार उपस्थित होते. निवेदनावर विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, ज्येष्ठ सदस्य विनायक दिवटे, नगराज पाटील, भुवनेश दुसाने, भिकन पाटील,निखिल मोर, दिलीप परदेशी, गजानन गिरी, राकेश सुतार, यांच्या सह्या आहेत.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला. देशात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मीडिया ही माध्यमे आप आपल्या स्तरावर अविरत कार्य करीत आहे. मात्र काही विघ्नसंतोषी व्यक्तींना हे सहन होत नसुन लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभास धोका निर्माण करण्याचे कारस्थान सुरु आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून लोकप्रिय सॅटेलाईट “लोकशाही न्युज चॅनल” हे केंद्राच्या माहिती ५ व प्रसारण विभागाकडुन ३० दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य निषेध व्यक्त करुन लोकशाही न्युज चॅनल तात्काळ सुरू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार संभाजी पाटील यांना देण्यात आले.