गोराडखेडा अपघातातील पीडित कुटुंबांना ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची भेट
येथे दि. 3 जानेवारी रोजी सायं. ५ वाजेच्या सुमारास पाचोरा जळगाव रस्त्यावर गोराडखेड्यालगत भरधाव कारणे दोन शालेय विद्यार्थिनी व दोन व्यक्तींना चिरडले. या भीषण अपघातात कु दुर्वा भागवत पाटील (इ. आठवी) व सुभाष रामा पाटील (वय ६०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर परशुराम दगा पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. समीक्षा (ऋतुजा) राजेश भोईटे (इ.आठवी) या मुलीलालाही दुखापत झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामविकास मंत्री तथा जामनेर मतदारसंघाचे आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी गोराडखेडा येथे पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली. प्रसंगी एका पाठोपाठ सलग चार व्यक्तिंना चिरडत या आरोपींमार्फत क्रूरपणाचे प्रदर्शन केले आहे.अपघाताची भीषणता पाहता नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मंत्री महोदयांकडे केली. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांचे सांत्वन केले. त्यासोबतच रस्त्यावर वेग मर्यादा यावी यासाठी लवकरच गतिरोधक निर्माण करून देणार असल्याचे सांगितले. प्रसंगी गोराडखेडा बु सरपंच पती जनार्दन महादू पाटील, गोराडखेडा खुर्द उपसरपंच पती धर्मराज दोधा पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र प्रल्हाद पवार, मनोज रामदास पाटील, निलेश कैलास पाटील, विकासो संचालक दिनेश उत्तमराव पाटील, गावातील ज्येष्ठ गोकुळ पंडित पाटील, किशोर विडू पाटील, हरी विष्णू पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.